हिरवे स्वप्ने
हिरवे स्वप्ने
काळ्या ढेकळात डोळा
हिरवं सपान पाहतो
असा कसा रे पावसा
तू हुलकावणी देतो
मातीत पुरलेल्या बिजालाही
ओलावा हवा असतो
तू तर मस्त ढगाआड निजलेला दिसतो
किती लावतोस रे तू पावसा वाट बघायला
आस धरुन असते धरा तुझी
येशील कधी रे तू भेटायला
सुकलीत डोळे
आता रडु ही येत नाही
मान मोडल्या पिकांची
तुला दया येत नाही
जरा दया कर रे पावसा
आता अंत नको पाहू
जीव दान दे तू मातीला
असा दुर नको राहू
नांगरणी झाली पेरणी झाली
आता दाखव डोळ्यांना हिरवे सपान
गेले किती आणि जातात किती रोज जीव
होवू दे आता शेतं मळे
हिरवे हिरवे रानं
सांगुन देतो पावसा तुला
आता करू नको कोणाचे कपाळ कोरे
त्याच्या मदतीला तू धाव
पाड आनंदाचा पाऊस
येऊ दे सम्रूद्धीच्या सरी
चिंब चिंब होवू दे गावं
चिंब चिंब होवू दे गाव
