STORYMIRROR

Supriya Devkar

Others

4.2  

Supriya Devkar

Others

हौस

हौस

1 min
51


अनेकदा मी ठरवतो 

आज तूला पूर्ण वेळ द्यायचा 

माझ्या हातचा चहा 

सकाळी उठल्यावर तुला द्यायचा 

अग नाश्ता तर तू बनवतेसच 

 आज बाहेर दोघांनी जावून खायचा 

तुझं किचन तुझच आहे पण 

आज मात्र मी आवरणार 

बिछान्यावरल्या चादरीला 

आज मात्र मी सावरणार

तुझ्या हातात जादू आहे 

हे तर मी मान्य करतो 

पण आज मी ठरवलयच

थोडीशी मालिश तुझ्या हातांची करतो 

कस असत ना 

तुला ग्रहीत धरतात सारे 

>

तुझ्या कडून खाण्यापिण्याचे 

लाड पुरवून घेतात सारे

पण तुला आलेल दुखणं 

कोणालाच बघवत नाही 

तुला हाताखाली वापरण्याची 

आमची सवय काही जात नाही 

तुझ्या जगण्याचा आम्ही 

अविभाज्य घटक आहोत 

पण तुझ्या इच्छांना ही 

इथे भरारीचे पंख राहोत 

म्हणूनच आज एक सागंतो तूला 

थोडस टोचून बोललीस तरी चालेल मला 

तुझ्या स्वप्नांना नकोस 

मनात दाबून ठेवूस 

तुलाही वाटत असेल की 

पुरवावी तुझी हौस


Rate this content
Log in