गुरु महिमा
गुरु महिमा
1 min
7
आशीर्वाद सदा गुरु कृपा हस्त
काळ करी फस्त मायाजाळ!!१!!
धन्य धन्य धन्य गुरुचे चरण
चुकवी मरण शिष्याचे ते!!२!!
चिखली असता कमळ ते फुले
गुरु कृपे डुले भाग्यवंत!!३!!
संतदास म्हणे किमया श्रद्धेची
नाश करी साची अहंकारा!!४!!
