सुंदर आमची शाळा
सुंदर आमची शाळा
चाल:- तुम तो ठहरे परदेशीं
साथ क्या निभायेंगे!!
शीर्षक:- आमची शाळा
सुंदर आमुची शाळा....
आम्हांशी लागलाय लळा!!धृपद!!
गुरीजींच आम्ही ऐकू
विद्या घेऊ शाळा शिकू
पाटी पेन्सिल करूयां गोळा!!१!!
सुंदर आमुची शाळा.........
डबा घेऊ शाळेत जाऊ
ज्ञानेश्वर डोळा पाहू
आनंदाने सारे खेळा!!२!!
सुंदर आमुची शाळा..........
पाटी घेऊ पुस्तक घेऊ
दप्तरं घेऊन शाळेत जाऊ
प्रार्थनेला होऊ गोळा!!३!!
सुंदर आमुची शाळा........
पाटी घेऊन आम्ही लिहू
बाराखळी आम्ही पाहू
आनंदाने म्हणू पाळा!!४!!
सुंदर आमुची शाळा.........
पुस्तक घेऊन आम्ही वाचू
आनंदाने आम्ही नाचू
धडा वाचू खळखळा!!५!!
सुंदर आमुची शाळा........
घंटा होता दप्तर घेऊ
हर्ष भरे घरी जाऊ
परिपाठ नित्य पाळा!!६!!
सुंदर आमची शाळा...........
