फलद्रूप भक्ती
फलद्रूप भक्ती
श्रद्धेविना देव नाही,
प्रेमे भक्ती अनुभवे पाही!!१!!
काय करी ते साबण,
प्रेम शुद्ध जलावीन!!२!!
पाण्या वेगळी मासोळी,
तैसा भक्त तळमळी!!३!!
संतदास म्हणे भक्ती
श्रद्धे सहित भुक्ती मुक्ती!!४!!
जगात आयुष्यभर भक्ती करणारे व भक्ती करतांना अनेक लोक दिसतात पण खरी भक्ती काय आहे ते त्यांना नं कळाल्याने पोट फुटेस्तव ताणून ताणून अभंग म्हणतील, पार शरीराने जर्जर होईस्तव भक्ती करतांना दिसतील पण सुख रुपी भक्ती मार्गातील फळ ज्याला म्हणतो ती भुक्ती मुक्ती त्यांना मिळत नाही खूप भक्ती मार्गातील ग्रंथ वाचन करतात शास्त्रार्थ करून प्रगाढ पंडितही बनतात पण त्यांना भक्ती मार्गातील फळ मिळत नाही त्याच कारण नुसतं शाब्दिक पोकळ ज्ञान जगाला देण्यातच आपली हुशारकी दाखवण्याप्रतत्यांची भक्ती दिसून येते किंबहुना त्यांच्या शब्द प्रभावाने लोक तरतील पण ते तरणार नाहीत त्याच कारण एकच आहे ते म्हणजे त्यांच्यात श्रद्धायुक्त भक्ती प्रेमाचा अभाव म्हणून तो देव पाहायचा असेल तर श्रद्धांयुक्त भक्ती प्रेमानेच तो देव प्राप्त होईल तेव्हाच खरं भुक्ती मुक्तीच सुख त्याला प्राप्त होईल तरच त्यांना भक्तीचा अनुभव घेता येईल....१
उदा. कितीही उच्चं किमतीच साबण आणला तरीही कापडं पाण्याशिवाय निघणारच नाही तसभक्ती करतांना प्रेमरूपी शुद्ध श्रद्धाजल असेलतरच ते प्रेमरूपी साबन भक्तीला लागेल व शुद्ध भक्ती घडेल .... २
नाही तर कितीही भक्ती केली तरीही त्यांना जसे पाण्या वेगळी मासोळी तळमळते त्या प्रमाणे त्या भक्ताला तळमळावच लागेल.... ३
म्हणून संतदास म्हणतात कि, भक्ती ही श्रद्धा रुपी प्रेमासहीत भक्ती असेल तरच त्याला देवाची भेट होईल आणि मगच त्याला भक्तीतील सुख म्हणजे भुक्ती मुक्ती त्याला प्राप्त होईल..... ४
