संत गजानन
संत गजानन
1 min
2
शेगावीचा राया संत गजानना
वंदूया चरणा योगियांचे!!१!!
मागू भक्ती मुक्ती तया चरणाशी
उद्धराचा राशीं तोचि एक!!२!!
विश्वाची ती दुःखे करुनिया नष्ट
स्थापियेली सृष्ट विश्व शांती!!३!!
संतदास म्हणे तोचि स्वामी माझा
भवतारी साजा गुरुराज!!४!!
