संत नर्सिंग महाराज अकोट
संत नर्सिंग महाराज अकोट
1 min
144
(अभंग नं ३७)
अकोट ग्राम दैवतं संत नरसिंग महाराज वर्णन
°••••••••••••••••••••••••••••••••••••••••••°
ग्राम दैवत माझे असे नरसिंग
फेडील तो पांग भवदुःखा!!१!!
जा जा रें बाबांनो शरणं तयाला
जन्मं त्याचा झाला जळगावी!!२!!
कर्म भूमी त्याची असे ती अकोट
जेथे समाधिस्त बैसलासे!!३!!
गायी वळीता तो सेवे रत झाला
करी गोपाळ काला नरसिंग!!४!!
भावभक्ती त्याची संगती हरीची
संत गजाननाची मैत्री ज्याची!!५!!
संतदास म्हणे होई शरणांगत
सुखाची पंगत घडे जेथं!!६!!
---------------------------------------
संतदास पु रा हिंगणकर पुणे.
