गोधडी
गोधडी
1 min
322
गोधडी आजीची
गोधडी मायेची
गोधडी साडीची
वाटे छान......//
गोधडी गरम
नरम नरम
असे मुलायम
गोधडी ती.....//
चिंध्यांची गोधडी
ती साखर झोप
गरमा अमाप
गोधडी ती.....//
आताची रजाई
मखमली छान
गोधडीचा मान
नसे तिला.....//
ठिगळ ठिगळ
टाक्यावर टाका
घरी ठेवता का
गोधडी ती......//
आजही आवडे
मला हो गोधडी
शिवते मी वेडी
गोधडी ती.....//
मऊ नरमाई
नसे चादरीला
भाव किंमतीला
गोधडी ती.....//
पाहायची तुम्हां
माझी हो गोधडी
नाजूक वा जाडी
वीण त्याची....//
छंद हो जपते
आवडे गोधडी
जमा करी साडी
मीनु सदा......//
