STORYMIRROR

@Aniket Maske

Others

3  

@Aniket Maske

Others

गणिका...

गणिका...

1 min
354

स्वप्न माझ्या अंतरीचे

नराधमांनी तुडवले पायदळी

खुडली उमलण्या आधीच

नाजुक फुलाची पाकळी,

बालपणी पडले येऊन

या देहभोगाच्या नरकात

खोल खोल बुडाले

या वासनेच्या गटारात

खेळणे झाले दुसऱ्यासाठी

खेळण्याच्या या वयात

आगीत वासनेच्या सारे

अंग अंग भाजले

सुंदर या कायेने माझ्या

जगण्याचे माथेरे केले

वासनाधुंद गिधाडांनी

आयुष्य सारे नासवले...


Rate this content
Log in