गझल
गझल
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
38
ते तिच्या मनात काय, लावशील थांग तू?
पाहिलास का तिचा न मोकळाच भांग तू?
जन्म लाविला तिने तुलाच शोधण्या पुरा
ठेवुनी तिला सुखात फेडशील पांग तू
अंतरी वसे तुझ्याच सावळा विठू सदा
त्या अमोल दर्शनास लाविलीस रांग तू
माझिया मनात काय ते तुला कसे कळे?
का प्रवेश घेतलास काळजात सांग तू
जी तुलाच घेतल्याविना न जेवली कधी,
पाहण्या तिची छबी तिला खिळ्यास टांग तू