घननीळ आला अन् गेला
घननीळ आला अन् गेला
1 min
5
नेणीवेत वेणू नाद
हळुवार घुमू लागला
मग नकळत जाणीव झाली
घननीळ आला अन् गेला
साचल्या तळ्यातील पाणी
अन् शांत तळ्यातील गाळ
थबकल्या देहवेणूत
तो प्राण फुंकुनी गेला
सूर्यफूल आयुष्याचे
त्या दिशेस जेव्हा वळले
Advertisement
>हरीच्या परिसाचा स्पर्श
जगण्याला तेव्हा झाला
एकदाच जेव्हा मी ही
संपूर्ण समर्पण दिधले
मग कुडीतुनी प्राणांना
तो सहज हाकारीत गेला
नुरली जगण्याची हाव
अन् कशास पुढचा जन्म
हा पाचोळाही त्याने
मग मोक्षपदाला नेला