गगनात तिरंगा शोभतो
गगनात तिरंगा शोभतो
1 min
242
गगनात तिरंगा शोभतो
झेंडा अमुचा प्रिय असे
तिरंग्याच्या रक्षणासाठी
सैनिक सदैव सज्ज असे...!!
लाखो क्रांतिकारक आजवर
हसत गेले फासावर
फडशा पाडला शत्रूचा
संकट आले जरी देशावर...!!
शिवछत्रपती, शिवशंभूचा आदर्श
नसानसांत इथं खेळतो आहे
वीरता, शौर्यता, साहस
नसानसांत भिनतो आहे...!!
आजवर आले गेले कित्येक
अनेक शत्रूचा केला खात्मा
तिरंगा आमुचा श्वास आहे
तिरंगा जणू देशाचा आत्मा....!!
