STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

गड किल्ले

गड किल्ले

1 min
360

गड किल्ले आहेत महाराष्ट्राची शान

जपणूक करा गडाची तूला शिवबाची आन...!!


लढलेत मावळे कित्येक येथे नरवीर

सोबतीला छत्रपती शिवबा शूरवीर.....!!


स्वराज्य रक्षण्या सांडले मावळ्यांचे रक्त

निष्ठावान मावळेच होते खरे शिवबाचे भक्त...!!


ऐतिहासिक जपू वारसा गडकिल्ले धन

स्वराज्यासाठी अर्पिले येथे सारे तन मन धन...!!


जगात पराक्रमी शूर शिवबाने लढले गड

शत्रूला कापूर उडवत केले धडावेगळे धड.....!!


शूरशिवबा असे साथीला घेवून हाती तलवार

माजविला होता मुघलांनी मराठी मातीवर हाहाकार...!!


अफजलखानास धडा शिकविला कोथळाच बाहेर काढून

वाघनखे पोटात खुपसली क्रूर खानाच्या आतड्या फाडून..!!


शौर्याने, धैर्याने लढलेत मावळे कित्येक गडकिल्ल्यासाठी

चला करू रक्षण गडकिल्ल्यांचे महाराष्ट्राच्या सन्मानासाठी....!!


एक एक गड जिंकले हातात भगवा ध्वज धरून

गडकिल्ले पाहता क्षणी आले मन माझे भरून....!!


जपून ठेवू चला सारेजण असा ऐतिहासिक ठेवा

महाराष्ट्राची शान,जान,मान गडकिल्ले आहेत मेवा....


Rate this content
Log in