STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

गावाची याद

गावाची याद

1 min
407


माझ्या गावाची हो याद

हिरव्या झाडाची साद

गोड कोकीळेचा नाद

आठवतो मजला....!!


डोंगराच्या पायथ्याशी 

नदी किनारी रे जाशी 

अंबरी ढगांच्या राशी 

दिसती सारे मज.....!!


गावात लोकांची गर्दी 

फोजी घालितो रे वर्दी 

एकमेका हमदर्दी 

गावात दिसतेय.......!!


माझ्या गावातली यात्रा

भरितसे छान जत्रा 

जवळ नदीच्या पात्रा

भरती काठोकाठ.......!!


गाईवासरे चरती 

डोंगर माथ्यावरती 

छान कुरणावरती 

हिंडती गुरंढोरं ....!!


जमतात हो राउळी 

रोज भजनी मंडळी 

दररोज सांजवेळी

दंग हो भजनात.....!!


आंबे, बोरं, चिंचा,खास

 फुलाचा सुगंधी वास

दरवळतो   सुवास

छान माझ्या गावात....!!

 

नांदतात सौख्यभरे 

एकतेचे रोज वारे

राहतात बोलणारे 

गावात लोक येथे....!!


कार्यक्रम करतात 

एकत्रच जमतात 

सुखाने रे नांदतात

गुण्यागोविंदाने हो....!!


Rate this content
Log in