STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

गारवा

गारवा

1 min
366

साद घाली माझ्या मना

ॠतू हिरवा हिरवा

सा-यांनाच आवडतो

गार गारवा गारवा...!!


नभ झाकाळून आले

ढग आले रे दुरून

तहानल्या भुई मग

ढग आले रे भरून...!!


गवताची पाती पाती

वा-यासंगे नाचतात

मन हिरवं हिरवं

मनी मोर नाचताता....!!


मन आनंदून गेले

धरा नटली नटली

हिरव्याच शालूसंगे

धरा थटली थटली....!!


वारा अंगाई रे गातो

मन उधान उधान

झाडाझाडातून आता

वाजतात सारे पान....!!


मन गारवा गारवा

येई अंगावर शहारे

थेंब थेंब पावसाचे

कसे फुटतात फवारे....!!


किती निसर्गाची जादू

ॠतूचक्र फिरविते

नतमस्तक होवून

धरा तुला मी वंदिते..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन