गार वारा
गार वारा
1 min
14.1K
किती गार वारा
या पाऊसधारा
या क्षणी सहारा
लाभेल कुणाचा?
संथ लाट येई
मन विचलीत होई
या क्षणी सावराया
हात येईल कुणाचा?
टपटपती थेंब नं थेंब
उलती आठवणीचे कोंब
प्रीतीच्या फुलपाखरा
आधार होई कुणाचा?
कातरवेळी,सांजसकाळी
मनतुषारांची धुमाळी
थांबवाया हा पारा
गारवा लाभेल कुणाचा??

