STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

एक रंग

एक रंग

1 min
257

एक रंग माणुसकीचा

भुकेला तान्हेला ओळखणारा

माणसात शोधून देव

माणसासम वागणारा.....!!१!!


एक रंग कर्तृत्वाचा

सर्वांना आदर्श ठरणारा

न्यायाची चाड ठेवून

अन्यायाविरुद्ध पेटणारा....!!२!!


एक रंग आत्मविश्वासाचा

एकमेकांना धीर देणारा

संकटात धावत येई मित्र

मित्रता जिवापाड जपणारा....!!३!!


एक रंग आपुलकीचा

मायेने जवळ करणारा

ॠणानुबंध कायम ठेवून

नात्यांची वीण गुंफणारा.....!!४!!


एक रंग सत्याचा

असत्याचा परदा उठवणारा

स्वाभिमान जागृत ठेवून

शिवबापरी स्त्रीयांचा आदर करणारा...!!५!!


एक रंग ज्ञान,मान,सन्मानाचा

आदर्शावर चालणारा

संस्काराचा घेऊन वारसा

माणुसकीवर भाळणारा...!!६!!


एक रंग विज्ञानाचा

नानाविध प्रयोग दाखविणारा

अंधश्रद्धेची करून मुठमाती

सर्वांना विज्ञानाकडे नेणारा....!!७!!


एक रंग देशप्रेमाचा

ओथंबून वाहणारा

स्वातंत्र्य, समता बंधुता

लोकशाही जपणारा......!!८!!


एक रंग तुमच्या ध्येयाचा

यशस्वीतेसाठी झटणारा

शेतक-यांच्या घामातून

मोती सुंदर पिकविणारा.....!!९!!


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ