एक दिवस बायकोसाठी
एक दिवस बायकोसाठी
एक दिवस जनता कर्फ्यूच्या निमित्ताने
या जिवाला आराम मिळेल
याचा मला खुप आनंद झाला
पण बायको डोळे फाडून म्हणाली
उठा चला आता कामाला लागा
मग काय रोज रोज काम करणारी अर्धांगिनी माझी
आता मात्र खुर्चीवर बसून ऑर्डर देत होती
कामाची यादी लांबलचक वाढवत होती
राग संताप तर मला खुप येत होता
आता तुमचं काही खरं नाही पप्पा.....!
म्हणून पोरगा चिडवतं होता
किचन पासुन तर प्रत्येक खोली दार खिडकी
तिने साफ करून घेतली
केर कचरा घरातले जाळे कानाकोपऱ्यातली भंगार
फेकायला लावली
बारीकसारीक भांडे
डबे पातेलेच नाही तर
जून्यापुराण्या चादरी गोधड्या सुध्दा धुवायला लावल्यात
साड्यांना कपड्यांना इस्त्री करून घेतल
्यात
फरशीला चांगला चकचकीत पोतारा मारायला लावला
दिवसभर कामे करून करून
बायकोने माझा जीवच घेतला
उपाशीपोटी पोट भुकेने कळ मारत होते
पण तिच माझ्याकडे बारकाईने लक्ष होते
ती मात्र जागची हालत नव्हती
जरा विश्रांती घेतली की
अंगावर धावून येत होती
काहीजरी झाल तरी कामापासून सुटका होणार नव्हती
बायकोच्या हातातली मानगुटी सुटणार नव्हती
एकमात्र खर मी केलेला कच्चापक्का स्वयंपाक तिने आवडीने खाल्ला
मग संध्याकाळी तिने केलेल्या चहाने थकवा
माझा कुठच्याकुठे पळाला
खरच स्त्रीच जगणे कसे असते
हे मी त्या एक दिवसाच्या जनता कर्फ्यूत शिकलो
बायको सोबत राहून खऱ्याअर्थाने बायकोच आयुष्य जगलो