STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

एक आठवण

एक आठवण

1 min
326


एक आठवण,

आईच्या हातची

चव त्या पोळीची

आगळीक.......!!


एक माझी शाळा

तिचा लागे लळा

शिकवण्या बाळा

स्फूर्ती येते.......!!


सय माहेराची

बालपण छान

आजीचे ते गाणं

आठवती........!!


एक आठवण

दिवाळीचा सण

दुःखी झाले मन

पितृ स्मृति.....!!


एक आठवण

कडक गुरुजी

त्यांचीच रे मर्जी

चालायची.......!!


एक आठवण

निकाल लागला

आनंद हो झाला

गुण छान........!!


एक आठवण

हरवली माया

सुखाची हो छाया

शोधू कुठे........?

एक आठवण

हरवली माया



साहित्याला गुण द्या
लॉग इन