दुःखाने
दुःखाने
मुबलक पुरावे कशाला मागवले दुःखाने
क्षणिक सुखाला कशाला पाठवले दुःखाने
मी अधांतरी असा एक वाटसरू काव्याचा
आधार होते उरलेले कशाला तोडले दुःखाने
कोण कुणाला पुसतो लोका हो आजवर इथे
गाडलेले स्वप्न थोडेसे कशाला खोदले दुःखाने
कालचाच विषय घे तू माणसा शिकण्यास
उगा असं घरात बसून कशाला ठेवले दुःखाने
जनजीवन विस्कळीत झालं हलगर्जीपणाने
स्वतःच्या काळजीने कशाला बांधले दुःखाने
जगणं शिकवून जाईल एक रोग माणसाला
गरीब माणसाचे अश्रू कशाला सांडले दुःखाने
जगलो काय अन मेलो काय समाजात आता
ती जळकी लोकं कशाला सांभाळले दुःखाने
