दृष्टिकोन
दृष्टिकोन
1 min
382
मुलाला शिकवता शिकवता
भूमितीचे पुस्तक चाळले
त्यात होते त्रिकोण काटकोन
लघुकोन विशालकोन
मला मात्र हवा होता दृष्टिकोन
काही केल्या तो मिळेना
विचार केला तेव्हा कळले
मुळी नसतोच तो भूमितेत
असतो तो मानवांच्या भूमिकेत
म्हणून म्हणते माणूसकी जपा
मिळेल तुम्हाला एक चांगला दृष्टिकोन
जो नसतो सर्वांन जवळ
हिच तरआहे खरी की माणूसकीची
ज्याला मिळाली ही ‘की’
त्याच्या कडे आहे भूतदया
ज्याच्या कडे आहे भूतदयेची दृष्टी
तोच खरा मानवतेचा श्रेष्ठी
तोच ठरे निव्वळ दृष्टिकोन
