दोष माझा सांगन जा
दोष माझा सांगन जा
सोडून नको जावूस तू
गून्हा माझा सांगून जा
निर्दोष आहे मी
दोष माझा तू सांगुन जा
बेसावद होतो मी
घाव तुझे घेताना
खेळ मांडून का मोडला
डाव मी जिंकताना
दिल्या भेटी त्या साऱ्या
तु घेवून जा
असा का हा दूरावा
तू सांगून जा
जपले किती तुला मी
स्वप्ने सुखाचे पाहून
विसरून गेलो मलाच मी
दुःख तुझे घेवून
सहवास माझा तू
आठवून पहा
अंतर असे का झाले
तू सांगून जा
किती वार केलेस तू
काळजी वेगळे होताना
मन ही उदास झाले
पावले तुझी वळताना
नजरेत बंदिस्त तुझ्या
नजर माझी देवून जा
काय चुकले माझे ते
तू सांगुन जा
राहिले असेल मनात काही ते तू पाहून घे
ठेवू नकोस काहीच काही
सारे काही वाहून ने
अश्रुंची फुले झालीत
तू एकदा पाहून जा
काय नाव ठेवू
दिल्या जखमाना
तू सांगुन जा
