STORYMIRROR

vishal palkar

Others

3  

vishal palkar

Others

दिवस एखादा असा असावा

दिवस एखादा असा असावा

1 min
11.7K

दिवस एखादा असा असावा 

खाऊन आंबट घसा बसावा 

टाळावे कधी गोड रोजचे 

धाब्यावर कधी नियम बसावा.... 


फिकीर चिंता फेकून बाहेर 

येऊ द्यावे आत स्वतःला 

जमेल तितके फिरून यावे 

आकाशाला कुंपण कशाला.... 


गाऊन गाणे, आयुष्याचे 

गाणे व्हावें, स्वर नसावा 

दिवस एखादा असा असावा 

खाऊन आंबट घसा बसावा.......... 


प्रश्न पडतील कित्येक सारे 

 द्यावी सुट्टी उत्तरांना

आयुष्य उभे का घालवावे

राहूदे कि एकटे प्रश्नांना...... 


गाल ओढून कधी एकांताचे 

एकटेपणा खुदकन हसावा.... 


दिवस एखादा असा असावा 

खाऊन आंबट घसा बसावा

वाचून पहावे पुस्तक बिस्तक 

उसने थोडे शब्द घ्यावे 

मनातल्या कधी अक्षरांना 

कागदावर कोऱ्या येऊ द्यावे.. 


लावून एखाद हलका सूर 

 गाऊन सुद्धा कधी बघावा 

कधी वीणा कधी होऊन पावा 

तबल्यावरती हात पडावा


दिवस एखादा असा असावा 

खाऊन आंबट घसा बसावा 

टाळावे कधी गोड रोजचे 

धाब्यावर कधी नियम बसावा


Rate this content
Log in