व्यक्तं
व्यक्तं


शब्दांची धार बोथट झाली
लेखणीने बोटांची रजा घेतली.....
बंद केलं आता व्यक्त होणं
व्यक्त होण्याची सजा घेतली......
जो शांत तो समर्थ
व्यक्त होण्या अर्थ नाही.......
व्यक्त होता कळते मात्र
शांत बसणे व्यर्थ नाही.........
मतं नसावीच माणसाला
असं माझं मत आजपासून...........
ज्याला जे घ्यायचं तेच तो घेतो
काही उपयोग नसतो शब्द तासून.......
तरीही हिम्मत करून एकदा
शब्द
विखुरले मी वाऱ्यावर.......
गळचेपी मग विचारांची
हा माणूस नाही थाऱ्यावर.........
दाबला जातो अहंकार
विचार मात्र फुलत जातात.....
तुमच्यासारखी माणसं साहेब
एक दिवस आड करून येतात.......
खुशाल घ्यावी शस्त्रे तुम्ही
वार करावा विचारांवर..........
होऊ देत मग शब्दांचे खून,
घनघोर युद्ध......
अखेर विचार मात्र अमर राहतील
कागदांच्या पानावर......
कागदांच्या पानावर.........