धुईमाती
धुईमाती
1 min
245
नका खेयू धुईमाती
कोरोना त्यो आला
केमिकलच्या रंगानी
कोरोना जर झाला....!!
धुईमातीत राज्याहो
मस्त मजा यायची
अंग घासून घासून
माय बेजार व्हाची....!!
काळभोर दिसे तोंड
ओयखायले ना पोर
गुपचुप येऊन फासत
सारा रंग तोंडासमोर.....!!
पयसफुलाचे रंग करू
चाल खेयू धुईमाती
कलरबिलर नको
असू दें थोडी प्रिती.....!!
कायजाच्या कोटयात
असू दे माणुसकीची नाती
कलरबिलर कायी नको
चाल खेयू धुईमाती....!!
