STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Others

4  

Sanjay Dhangawhal

Others

देवा तुझ्या भेटीला

देवा तुझ्या भेटीला

1 min
329

देवा तुला भेटायला यायचं होतं

पण तुझं दर्शन आता ऑनलाइन बुकिंग करावे लागते

तुला डोळे भरून पाहण्यासाठी

तुझी वेळ घ्यावी लागते


देवा तू खूप दूर दूर असतो

म्हणून तुझ्यापर्यंत येणं होत नाही

तुझे दर्शन आता पहिल्यासारखं घेता येत नाही

तुला हात जोडायलाही खूप पैसे मोजावे लागतात

तुझ्या नावाने प्रत्येकजण पैसेच मागतात


तासनतास रांगेत उभे राहूनही

तुझी खूप वाट पहावी लागते

प्रसाद घ्यायचा असला तरी

दक्षिणा द्यावी लागते

तुझ्या नावाने सारेच कसे पैसे मागत असतात

दानधर्माच्या नावाने कोणालाही लुटताना दिसतात

देवभक्त तुझ्या गाभाऱ्यात यायलाही 

तिकीट काढून उभाच राहत असतो

मंत्री अधिकारी व्हिआयपीला

मागच्या दारून प्रवेश मिळतो


देवा तू पैशाचा नाही

फक्त भावभक्तीचा भुकेला आहे

म्हणून

रेटत राटत गर्दीतून वाट काढीत

कसेतरी तुझ्यापर्यंत पोहचतात

तुला डोळेभरून पाहून

तुझ्यापुढे नतमस्तक होतात


पण देवा कुठे काय चाललंय

हे तुला माहित नाही

असे मुळीच नाही

पण तू ऑनलाइन असल्यामुळे

तुझेही काही चालत नाही

काळे-गोरे दिसू नये म्हणून

तुला अंधारात ठेवला आहे

देवदर्शनाचा नुसताच बाजार मांडला आहे

खूप खूप गर्दी असूनही

तुझ्यावरची श्रद्धा काही

कमी होत नसते

तुला हात जोडल्याशिवाय कुणाचीही यात्रा पूर्ण होत नसते


Rate this content
Log in