देवा दर्शन दे रे आता...
देवा दर्शन दे रे आता...
मूषक वाहन तुझे रे,
तू बुद्धीचा दाता
रिद्धी सिद्धी नांदे दारी,
शिव शंकर पिता...
हिरवा दुर्वा तुला वाहिला
जास्वंदीचा मान हा तुजला
पक्वान्नांचा बेत ठरविला
मोदक लाडू आवडे तुला
सर्व प्रथम तूलाच मान
लांब सोंड अन मोठे कान
लंबोदर तुज पूजती गण
एकदंत नाव शोभे छान
सुखकर्ता तू , दुःखहर्ता तू
विश्वाचा पालनकर्ता तू
तूच कर्ता आणि करविता
सर्व गणांचा गणपती तू
एकेरी तुज सारे बोलती
जसा तू सखा सवंगडी
चंद्र हासला खुदुखुदु तुजवरी
शाप देऊनी तू मोडली खोडी
देवांचा दे तू माझा
लाडका गणराया
दर्शन दे रे आता
ये आम्हा ताराया