छळणारी ती नजर
छळणारी ती नजर
1 min
438
धीर एकवटून त्याने विचारले तिजला
तुझ्या डोळ्यातले भाव सांग ना मजला
छळणारी ती नजर तुझी स्वस्थ नाही बसवत
एकटेपणात तूला आठवून ठेवते मला हसवत
धडधडत काळीज तूला एकटक पाहताना
काही सुचतच नाही तू समोरून जाताना
नाही राहीलो काॅलेजकुमार तरीही कळ उठते
न बोलता तुझ्या प्रेमाची भावना मनी दाटते
खोलवर कुठेतरी दडलेला एक कप्पा तुझा
एकटेपणात मात्र असतो तो फक्त माझा
तुझं हसण तुझं बोलणं साठवलय मी त्यात
नेहमी नसेना का पण कधी रमतो मी तुझ्यात
