चेहरा
चेहरा


वाट पाहत बसतो एकांतात
अन् नकळत घडते काही
माझाच चेहरा हसतो
देतो तुझ्या येण्याची ग्वाही
तूझ चोरपावलांनी येणं
माझ्या नजरेतून सुटत नाही
बहाणे किती बनवतेस
त्याला काही मर्यादा नाही
पण तू आलीस की
अहाहा माहोल खुलून जातो
हसणार्या फुलांची उधळण
मनाला आनंद देऊन जातो
तुझा विरंगुळा मोलाचा वाटतो
मन थोडसं हलकं होतं
तु गुणगुणलीस की शब्दांना
मोठ्याने गावस वाटत