बरसू दे प्रेम आता
बरसू दे प्रेम आता
1 min
183
बरसू दे प्रेम आता
नको मनी राग द्वेेेष
चार दिवसाची जिंदगी
कर्म चांगले राहील शेष...!!
उसवल्या नात्याला
विण प्रेमाची गुंफूया
एकमेकांचा आधार
खंबीरपणे होऊया....!!
नाही काही नेणार
जाताना देवाघरी
माणसाची माणुसकी
बरसो प्रेमाच्या सरी...!!
नको दुःख चिंता उरी
राहू प्रेमाने चांगले
एकमेका साहाय्य
करणारे माणसे भले....!!
सुखदुःखाच्या वाटा
शोधू सुखाचा मार्ग
माणसाचे भलं कर
मिळेल धरेवर स्वर्ग....!!
