STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

बंधन

बंधन

1 min
49


हे बंधन नसे नाजूक 

ज्यास पुरे हा नाजूक धागा

या गर्भरेशमी नात्याला

मिळे कुठेही जागा 

या धाग्यांमध्ये गुुंफूणीया 

प्रेम वात्सल्य अन् माया 

मिळो अखेरापर्यंत

तुझ्या सहवासाची छाया 

बघ ओवलेत या धाग्यांमध्ये 

क्षण आपले हे आठवणींचे 

तू ठेव तुझ्या स्मरणात 

क्षण आपले हे साठवणीचे

बहिण भावाचे हे निखळ नाते 

दूर राहूनही जपले जाते 

सहवास लाभला थोडका जरी 

नाते अविरत फुलले जाते


Rate this content
Log in