भूक...?
भूक...?
1 min
422
भूक भागता अन्नाची
मनुष्य म्हणतो आता पुरे,
पण पैशाची ती भूक तयाची
भागत नाही हेच खरे
स्वतःचे मन मारूनी कोणी
संचय करतो पैशाचा,
कोणी करी खून, चोरी, लबाडी
मार्ग धरतसे असत्याचा
पैशाचा खणखणाट असा की
बसू ना देई कधीच शांत,
असून सगळे असे उदासी
हीच खरी जीवनाची खंत
अन्न असो वा असो तो पैसा
पचेल जितके तितकेच खावे,
भूक असो मग कशाचीही ती
भागल्यावर तृप्त होऊनी जावे
