भूक
भूक
1 min
493
भूक लागली माणसा
तुला तरी ही कशाची
कुठे गेली माया ममता
आपल्या या बंधुत्वाची
रान पडले ओसाड
आपले नदीच्या पल्याड
काही येत नाही शेतात
तुला शहराची ओढ
भूक लागली तुला रे
देशाच्या रक्षणाची
तू विसरलास मायबाप
आणि वाटही शेताची
माय रडते तुझी रे
सतत आठवण काढूनी
तू झोपला निवांत
देशाचा तिरंगा ओढुणी
भूक नाही भाकरीची
मला काळजी लेकराची
काळ्या आईची शपथ
सेवा करू या देशाची
