STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

बहिणीची माया

बहिणीची माया

1 min
330

बहिणीच्या मायेला

जगी नाही तोड

आईनंतर तीच आई

जणू फणसाचे गरे गोड....!!


आईसारखी प्रेमळ गोड

बापापरी काळजी करी

बालपणीच्या आठवणी

मोठेपणी जाई दिल्या घरी....!!


स्नेहाचा बंध अतुट

भाऊबीज करी साजरी

माहेराची सय येता

दिसते गोड गोजिरी.....!!


संटकात सदा हात देते

सदैव पाठीशी उभी राही

वात्सल्याची मुर्ती जणू

डोळेभरून भावा पाही...!!


खोडकर असला भाऊ जरी

पाठराखण बहीणीची

प्रत्येक चूक पोटात घाली

आधारच ती घराची.....!!


ज्ञानेश्वराची मुक्ताई

खरी समजूत घाली

कृष्णालीच्या संकटाला

कृष्णच तो खरा वाली....!!


प्रेम बहिणीचे झाकृत असे

खरी बहिणीची माया

आईसारखीच ताई असते

आशिर्वादरूपी तिची छाया....



Rate this content
Log in