भाषा
भाषा
1 min
14.7K
भाषणांची भाषा नेहमीच वेगवेगळी असते.
पण रडणाऱ्या आई बहिणींची भाषा एक सारखीच असते.
लोकसंख्येच्या रजिस्टरमध्ये नोंदलेली भाषा वेगळी असते
पण घराघरातून ऐकू येणाऱ्या
मृत्यूगीतांची भाषा एक सारखीच असते.
कवी -पाश
मराठी अनुवाद- निरंजन उजगरे
