Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samadhan Navale

Children Stories Children

3  

Samadhan Navale

Children Stories Children

भारताची मुले

भारताची मुले

1 min
175


आम्ही मुले या भारत देशाची फुले

सुंदर देश असे हा आपला...

मन हे आमचे बोले ||


आई आमची काळी माती,

भविष्य इचे आमच्या हाती,

या मायेच्या पदराखाली

मन हे आमचे डोले..||१||


खेळू, बागडू या रे सारे

फुलवा मनाचे मोर पिसारे

सूर्य चंद्र हे आकाश तारेे

धरासवे भिजलेले ||२||


खूप शिकू या,काम करु या

देशाला या उंच नेऊ या

भारत भू ची आण आम्हाला

प्राण इला वाहिले..||३||


मित्र-मैत्रिणी आपण सारे

काळे असो कुणी, वा कुुुणी गोरे

भेदभाव तो आम्हा न माहित

एका माळेची आम्ही फुले ||४||


कधी हसावेे कधी रडावे

कधी खुल्या नभाखाली बागडावे

विज्ञानाचे अस्त्र घेऊनी

अंतराळी टाकीन पाऊले...||५||


Rate this content
Log in