भारत महान
भारत महान
1 min
205
भारत महान
आहे माझा देश
भिन्न जरी वेश
देशामध्ये......!!
इथली ही माती
पवित्र धरती
शेत हो पिकती
चहूकडे........!!
अनेक रे जाती
एकत्र राहती
प्रेमात रे न्हाती
भारतात......!!
मी रे भारतीय
देश हो भारत
वीर रे जगात
विश्र्वामध्ये......!!
किती गाऊ गान
भारत महान
नसे कोणी सान
भारतात.......!!
पोलादी मावळा
मिळे भारतात
शिवगान गात
गाजे जगी......!!
वीरांचा हा देश
करते प्रणाम
घ्यावा रे सलाम
मिनाक्षीचा......!!
