बाप
बाप
कुणाचा बाप एकटाच
स्मशानात जळतो
तर कुणाचा बाप कुठेतरी
पार्किंगमधे बेवारस मृत पडलेला असतो
आयुष्यभर झिजणाऱ्या बापाचा अंत इतका का वाईट होतो
मुलगा म्हणजे म्हतारपणाची काठी
याच भ्रमात बापाने जगायचं आणि हळूहळू
जगणं कमी करुन घ्यायचं
पण काय...
बापाच्या कष्टाला कोरड लागेपर्यंत मुलगा हात जोडत असतो
ध्येयसाध्य झाल्यावर
हात सोडत असतो
कितीतरी स्वप्न बापाच्या डोळ्यात असतात
मुलाच्या संगतीने बघायचे असतात
म्हणून कायतर...
बापाने मुलाचे कर्तृत्व
मोठ्या अभिमानाने सांगायचे
मुलाने मात्र बापाचे कर्तव्य विसरायचे
बाप कधीच त्याचे कष्ट दाखवत नाही
स्वत:च्या वेदना
मुलाच्या चेहऱ्यावर येवू देत नाही
बाप कष्ट करून मुलाला मोठं करत असतो
राबणाऱ्या हातांनी मिठीत घेत असतो
पण...
आजकाल तर म्हणे आपल्याच बापाचं म्हातारपण कोणीच स्विकारत नाही
थकलेल्या देहाला आधार कोणीच का देत नाही
त्या बापाला मुलाच्याच मांडीवर शेवटचा श्वास घ्यायचा असतो
पण बाप बिचारा दोन नात्यातले अंतर मोजत असतो
खरं सांगायचं तर
जसे कराल तसे भराल हा निसर्गाचा नियम आहे
तेव्हा प्रत्येकाला म्हतारपण येतच विसरायचं नाही
चुकीच्या कर्माची परतफेड केल्याशिवाय अंत नाही
