बाप कुठेच नसतो
बाप कुठेच नसतो
वरवर कठोर दिसणारा बाप
आतून खुप हळवा असतो
सर्वांची काळजी घेणारा बाप
कोणालाच कळत नसतो
बापाच एकच काम
घराचा आधार होवून जगायचं
सगळ्यांना सांभाळून एकत्र ठेवायचं
बापाशिवाय कोणाचे स्वप्न पुर्ण होत नाही
पण कष्टकरी बापाच्या
वेदना यातना परिश्रम
कोणी समजून घेत नाही
घरात पाऊल टाकताच
आईला बघायचं
दिसली नाही की
बापाला विचारायचं
घरात बाप असतानाही
आई आई आईचाच गजर सुरु असतो
पोटतिडकीने वाट बघणारा बाप मात्र
कोणालाच दिसत नसतो
बाप कसाही असला
साधा सरळ गरीब दुबळा
तरी काहीच कमी पडु देत नाही
लेकरबाळांना लाचारीने झुकू देत नाही.
घरात बाप नसल्यावर
होकार कोणी देत नसतो
बाबा कुठे गेलेत कोणी विचारत नसतो
ईथे तिथे चार चौघीत
आईचाच पुढाकार असतो
कुटुंबासाठी राबणारा बाप
सगळ्यात शेवटी असतो
आईच्या नावे किती गाणे किती कविता असतात
बापासाठी मात्र शब्द सुचत नसतात
इतिहासाच्या प्रत्येक पानावर आईचे मातृत्व लिहले असते
बापाच्या कर्तृत्वाचे पान
मात्र कोरेच असते
बाप सर्वांसाठी असतो
पण बापासाठी कोणीच नसतो
बाप जेव्हा आपल्यातुन वजा होतो
तेव्हा बाप कळतो
बापाशिवाय कपाळाचा कुकूंही शोभून दिसतं नसतो
