Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Samadhan Navale

Children Stories Children

3  

Samadhan Navale

Children Stories Children

बालसृष्टी

बालसृष्टी

1 min
200


किती निर्मळ आमची सृष्टी,

जशी नितळ –निर्मळ दृष्टी,

नाही जगात ‘या’कुणी कष्टी,

सांगे आजी-आजोबा छान गोष्टी ||


द्वेष, वैर, शत्रुता, आमच्या विचारात नाही 

बरे,अलिप्त तणावापासून,

जगात आमच्या आम्ही राही,

कशास उगीच भांडणतंटा,

कशास उगीच माराकुटी ||


दप्तराच्या ओझ्याहून गडे

मस्त खेळणे आम्हा आवडे,

सवंगड्यासवे करुनी क्रीडा

कधी हसुनी कधी रडे, 

करूया ओळख निसर्गाची या..

जग हे मनी असे कपटी ||


आवडे ना मज मारकी बाई

तिला तर मुळी दयाच नाही,

मारून आम्हाला होते खुश

जशी गोठ्यातील मारकी म्हैस,

गणित-विज्ञान तर वाटे तारेवरची कसोटी ||


आवडे पुस्तक वाचणे पण..

नको अभ्यासाची कटकट,

गृहपाठ करुनी चटकन

जावे मैदानावर पटपट,

तरी का ही ‘मोठी’माणसे ,

ओरडतात आम्हावरी कशासाठी ? ||


किती निर्मळ आमची सृष्टी,

जशी नितळ –निर्मळ दृष्टी

नाही जगात ‘या’कुणी कष्टी,

सांगे आजी-आजोबा छान गोष्टी ||


Rate this content
Log in