STORYMIRROR

Durga Deshmukh

Others

3  

Durga Deshmukh

Others

बालपणीचा खेळ

बालपणीचा खेळ

1 min
384

फुटलेल्या बांगडीचा काच 

ठेविला डब्यात लपुन 

काच कंगडीचा डाव 

मैत्रिणीसोबत मांडला जपुन 


फेकलेल्या चिंचुक्याला 

होती किंमत किती 

बांगड्याला सरके काच 

चिंचोक्याच्या चंफलाची गती


खेळाच्या घराच्या रेघाट्या 

मिळे कोळशाला मान 

घर घर काच सरकता 

हात रंगती नसे भान 


किती आनंदाचा खेळ 

जोड्या घेती वाटुन 

चार ठिकाणी बसती 

आपले हक्क थाटुन 


असा खेळ खेळे सर्व 

नाही याला वयाचे बंधन 

स्मरणशक्ती वाढवी खेळ 

या खेळाला करिते वंदन



Rate this content
Log in