बाकी आहे
बाकी आहे
1 min
448
देहात माझ्या अजून प्राण बाकी आहे
समाजात माझा अजून मान बाकी आहे
सोडले होते यांनी मला भिकारी म्हणून
त्यांनी दिलेले अजून दान बाकी आहे
विसरलो नाही एक एक चटका हृदयाचा
दगा दिलास ती अजून घाण बाकी आहे
सोडलं आहे एकटं झुरणं आता जरासं
झुरल्यानंतरही अजून भान बाकी आहे
का मुजोरी केलीस तू पावसा मनावर
अपूर्ण कवितेचे अजून पान बाकी आहे
आसवांचे पेरले होते स्वप्न नव्याने मी
ठोकरले जरी तू अजून शान बाकी आहे
सरण माझे पेटले तिरस्काराने तुझ्या
जाळलेले ते अजून रान बाकी आहे
