अत्तर
अत्तर

1 min

11.5K
उष्ण उसासे रिक्त धरेचे,
प्रश्न नभाने पेलायाचे.
कधीतरी मग सुटते कोडे
तयारीत ढग थांबायाचे
पाऊस ठरे दूत नभाचा
कोसळून तो देई उत्तर
रोमरोमी मग भिनू लागते
धरतीच्या श्वासांचे अत्तर.