अश्रू
अश्रू
1 min
44
आठवणींचा बांध फुटला
हरवून गेलो तुझ्या स्मृतीत
क्षणांना बसलो जुळवून
अश्रू ओघळला मज झोळीत
तुझी आठवण ठेवली शाबूत
अगदी जशी की तशी
तुझ्यात रमताना बघ
वेळ विसरून जातो कशी
तुझं कौतुक कधीच
थांबलच नाही जिवनात
आता मात्र भकास वाटते
या मोकळ्या रानात
खुलवलास संसार इवलासा
ठेवलीस सावरून घडी
अन् अचानक तोडलीस
घट्ट धरून ठेवलेली जोडी
