अश्रू
अश्रू
दुःख होते अपार तेव्हा
अश्रू येती नयनी,
आनंदाला उधाण येता
नयनांमध्ये येते पाणी
व्यक्त होण्या भावना अश्रू
हे तर माध्यम ठरते,
भावनांचा संदेश घेऊनी
नयनांमधूनी ढळते
मन हळवे ते नारीचे
अश्रू तिजला वरदान,
साठले अश्रू नयनी तर
कासावीस होई प्राण
प्रेमभावना, दुःखवेदना
अश्रूंमुळेच कळती,
अश्रू पाहूनी अनेकदा
मन दुःखाने हळहळती
बहुमुल्य हे अश्रू
मोठे आहे महत्त्व त्यांचे
त्यांच्यामुळेच महत्त्व
भावनांचे अन् नयनांचे
प्रत्येकाच्या अश्रूंना
मानाचे स्थान मिळावे
ओघळलेल्या अश्रूंचे ते
मोती बनूनी जावे...
