असेही प्रेम
असेही प्रेम

1 min

245
भावनांच्या बाजाराची मांडावी
उजळणी तरी किती....
रोजचा घात होतो प्रेमाचा
सांगावं तरी किती....
जोडली जातात नाती
कधी घट्ट कधी सैल
दुरावतात असली जवळ
किंवा लांब कित्येक मैल...
उसवलेलं जातो जोडायला
ठिगळ लावून मिरवतो
उगीच खोट्या जगण्यातला
'मी 'पणा झिरपतो....
बहाण्यांचे जीवन सारे हे
उगीच का जगावे असे
हदयांनी हदय जोडावे
माणुसकीचा झरा जसे...
बाकी काही उरत नाही
प्रेमाचे दोन शब्द पुरे
जगा आणि जगू द्या
भावना ही जपूया सारे...