अंत
अंत

1 min

11.6K
गळलेल्या पानाची
व्यथा कोण समजेल
कडू दुःखाची चव
त्यालाच उमजेल
तळमळलेल्या जीवाचा
तुटवडा तुटेल
त्रयस्थ शरीराची
व्यथा मातीत रुजेल
पाणावले डोळे
अश्रूंच्या डोहात बुडेल
कोमेजलेला देह
चक्रीवादळात फसेल
सारखं भारावलेलं
मन शेवटी संपेल