STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

अंकल नका ना म्हणू

अंकल नका ना म्हणू

1 min
273

अंकल नका ना म्हणू.

का,पडतो प्रश्न हा,काय,

आवाज देऊ,काय म्हणू.

जरी वाटलो मोठ तुमच्या पेक्षा, पण,अंकल नका ना म्हणू.

आपुलकी कमी थट्टा जास्त,

दिसते तुमच्या अंकल म्हणण्यात.

उद्धट पणा स्पष्ट झळकतो, तुमच्या डोळ्यात, तुमच्या बघण्यात.

मस्करीचा भाव एकदम दिसतो,

तुमच्या अंकल म्हणण्यात.

भाव असतो एकदम वेगळा,

तुम्ही ईज्जतच काढता जनु.

जरी वाटलो मोठ तुमच्या पेक्षा, 

पण,अंकल नका ना म्हणू.

होतो त्रास आदर द्यायला,

आपल्याच लोकांना तुम्हाला.

आव आणुन अंकल म्हणता,

सभ्यता दाखवता कोणाला.

नात नसताना जेव्हा अंकल म्हणता,

तेव्हा जळतो शरीरातील आणु रेनु.

जरी वाटलो मोठ तुमच्या पेक्षा,

पण,अंकल नका ना म्हणू.

म्हणा ना,सर,साहेब, महोदय

जर संबोधयाचेच असेल तर.

अंकल म्हणून, का म्हणून, आपुलकी दाखवता वरवर.

माहित नसताना, कारण नसताना,

हे अंकलचे शब्द का मी सुनू. 

जरी वाटलो मोठ तुमच्या पेक्षा,

पण,अंकल नका ना म्हणू.

अंकल नावाच पाश्चात्य शेपुट,

का म्हणून हालवतं फिरायच.

संस्कार आपले हे जगमान्य,

मग का उगाचच अंकल म्हणायच.

जगाला जिने सभ्यता दिली,

भारत देश आहे ती काम धेनु.

जरी वाटलो मोठ तुमच्या पेक्षा,

पण,अंकल नका ना म्हणू.

अंकल,अंकल म्हणता, कि,चिडवता,

वयातील तफावत का आपल्या दाखवता.

वयाचा अंदाज दाखवणारे आपण कोण,

दुस-याच दाखवुन, स्वतःच का दडवता.

आदराच्या पार्श्वभूमीवर, अंकल म्हणून आमची कब्र नका ना खणु.

जरी वाटलो मोठ तुमच्या पेक्षा,

पण,अंकल नका ना म्हणू.

एकमेकांना सन्मान देऊ आपण,

अंकल म्हणायचेच असेल तरी पण.

उच्चारात आणा थोडा मधुरपणा,

एकमेकांना देऊ सर्व मान सन्मान.

प्रेम देऊन,आदर देऊ आपण,

यातच जीवनाच मर्म जानु.

जरी वाटलो मोठ तुमच्या पेक्षा,

पण, अंकल नका ना म्हणू.

अंकल नका ना म्हणू


Rate this content
Log in