STORYMIRROR

Manik Nagave

Others

3  

Manik Nagave

Others

अंधश्रद्धा निर्मुलन

अंधश्रद्धा निर्मुलन

1 min
375

अंधःकार अज्ञानाचा , 

दूर सारू या चला .

विज्ञानाच्या कसोटीवर ,

खरे उतरू या चला .

श्रद्धा हवी डोळस ,

मनाला हवी पटणारी .

नका ठेवू अंधश्रद्धा ,

उजेडात डोळे झाकणारी .

उघडी ठेवा कवाडे मनाची 

सारासार विचार करा .

बुवा, बाबा, माता यांची ,

भरणारी दुकाने बंद करा .

आपली बुद्धी आपले मनगट ,

भविष्य आहे आपल्या हाती .

नका बांधू दावणीला स्वतःला ,

हिमतीने कोरा भविष्य माथी


Rate this content
Log in