अलगद
अलगद
1 min
189
काया नाजूक कोवळी
स्पर्श मऊ कापसाचा
माता प्रेमे घेई बाळा
अलगद पापा त्याचा
भाव सारे ओळखून
प्रिये गाली आणी हसू
नकळत तिच्या तिचे
अलगद पुसे आसू
फुले प्राजक्त दारात
सारा सुगंध मनात
मोह नावरे घेण्याचा
अलगद ओंजळीत
मन मनाशी गुंतले
भाव भावाशी जगात
दुराव्याचे दु:ख लपे
अलगद पापणीत
आई बाबा देव त्यांचेच
जगी साऱ्या बालकांचे
दु:ख दूरच ठेवती
अलगद उचलत
